esakal | पाक हवाई दलाचे विमान कोसळले
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan-Army-Plane

वैमानिकांना प्रशिक्षण देणारे पाकिस्तान हवाई दलाचे विमान आज दुर्घटनाग्रस्त झाले. ही घटना पिंडीघेब येथे घडली असून वैमानिक सुरक्षितपणे बाहेर आल्याचे वृत्तात म्हटले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून त्याच्या अहवालानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असे हवाई दलाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

पाक हवाई दलाचे विमान कोसळले

sakal_logo
By
पीटीआय

इस्लामाबाद - वैमानिकांना प्रशिक्षण देणारे पाकिस्तान हवाई दलाचे विमान आज दुर्घटनाग्रस्त झाले. ही घटना पिंडीघेब येथे घडली असून वैमानिक सुरक्षितपणे बाहेर आल्याचे वृत्तात म्हटले आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून त्याच्या अहवालानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असे हवाई दलाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाकिस्तान एअरफोर्सने निवेदनात म्हटले की, हवाई दलाचे विमान नियमित प्रशिक्षणादरम्यान पिंडीघेब येथे कोसळले. यावेळी कोणताही प्राणहानी झाली नाही. अपघातानंतर वैमानिक सुरक्षितपणे बाहेर आला आणि जमीनीवरही कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नाही.

Edited By - Prashant Patil