
आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. अशातच श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत जगातील आघाडीच्या रेटिंग एजन्सींनी इशारा दिला आहे. एजन्सींकडून पाकिस्तानात आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तान स्वतःची संपत्ती दुसऱ्या देशाला विकणार आहे.(Pakistan Economic Crisis)
पाकिस्तानने देश चालवण्यासाठी परदेशी लोकांना मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. तिथल्या फेडरल कॅबिनेटने अशाच एका अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. या अध्यादेशात सर्व योग्य प्रक्रिया आणि नियामक छाननीच्या पलीकडे जाऊन सरकारी मालमत्ता इतर देशांना विकण्याची तरतूद करण्यात आली आहे.(Pakistan emergency sale of government property to other countries)
शनिवारी मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार, इंटरगव्हर्नमेंटल कमर्शियल ट्रान्सफर ऑर्डिनन्स 2022 ला गुरुवारी फेडरल कॅबिनेटने मंजुरी दिली. या अध्यादेशानुसार, मंत्रिमंडळ समितीच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही किंवा या अध्यादेशाद्वारे परदेशी सरकारांशी होणाऱ्या व्यवहारांची कोणतीही तपास यंत्रणा चौकशी करू शकत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळखोरीचा धोका टाळण्यासाठी पेट्रोलियम आणि गॅस कंपन्या आणि सरकारी मालकीच्या वीज कंपनीतील भागभांडवल युनायटेड अरब अमिरातीला 2-2.5 अब्ज डॉलर्समध्ये विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी अद्याप या अध्यादेशावर स्वाक्षरी केलेली नाही, असे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानातील परिस्थिती का बिघडली?
पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा 10 अब्ज डॉलरच्या खाली गेला आहे. देशातील महागाईचा दर 20 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया घसरला असून तो 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत आहे. ज्या देशांशी पाकिस्तानचे व्यापारी संबंध आहेत, तेथे मंदीच्या भीतीने व्यापारात घट झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.