
लाहोर : पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात नऊ मे २०२३ या दिवशी उसळलेल्या दंगलप्रकरणी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने ७५ नेत्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व जण ‘पीटीआय’चे नेते व समर्थक असून त्यांना तीन ते दहा वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे.