पाकिस्तानी चौकीबाहेर गाढव ओरडतेय जोर-जोरात...

वृत्तसंस्था
Monday, 8 June 2020

पाकिस्तानमध्ये एका गाढवाची जोरदार चर्चा सुरू असून, त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, या गाढवापेक्षा चर्चा आहे ती पोलिसांची. कारण, पोलिसांनी गाढवाला अटक केली असून, त्याला चौकीबाहेर बांधले आहे.

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये एका गाढवाची जोरदार चर्चा सुरू असून, त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, या गाढवापेक्षा चर्चा आहे ती पोलिसांची. कारण, पोलिसांनी गाढवाला अटक केली असून, त्याला चौकीबाहेर बांधले आहे.

...म्हणून रुग्णालयाने वृद्धाला ठेवले बांधून?

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील रहीम यार खान भागातील पोलिसांनी जुगार खेळण्याच्या आरोपाखाली चक्क गाढवालाच अटक केली आहे. गाढवाला अटक केल्यानंतर चौकीबाहेर आणून बांधण्यात आले आहे. गाढव जोरजोरात ओरडत असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असून, पोलिसांची नाचक्की होऊ लागली आहे.

आई, मी आलेच म्हणाली अन् मारली उडी...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'रहीम यार खान भागात जुगार खेळला जात होता. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून आठ जणांसह एका गाढवाला अटक केली. शिवाय, एक लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त केली. अटक केलेले व्यक्ती गाढवांच्या शर्यतीवर पैसे लावत होते. पोलिसांनी कागदोपत्री आठ जणांसह गाढवालाही आरोपी बनवले आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan donkey arrested for gambling video viral