बलात्काऱ्यांना नपुसंक करणं इस्लामविरोधी; पाकने हटवली कायद्यातील तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

बलात्काऱ्यांना नपुसंक करणं इस्लामविरोधी; पाकने हटवली कायद्यातील तरतूद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इस्लामाबाद: बलात्कार ही घटना अत्यंत अमानवीय मानली जाते. वेगवेगळ्या देशांमध्ये बलात्कार करणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा आहेत. पाकिस्तानमध्ये बलात्काऱ्यांना आळा बसावा यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येण्याच्या हालचाली सध्या सुरु आहेत. त्यासंदर्भातच सरकारने एक विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मांडलं आहे. यामध्ये बलात्काऱ्याला 'केमीकल कॅस्ट्रेशन' अर्थात नपुसंक बनवण्याची देखील तरतूद करण्यात आली होती. मात्र, आता ही तरतूद हटवण्यात आल्याचं एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलंय.

हेही वाचा: भारतामुळे अमेरिकेवर ताशेरे; नाव समाविष्ट न केल्याने वादंग

'वॉर अगेन्स्ट रेप' या संस्थेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधील न्यायालयांमध्ये ३ टक्क्यांहून कमी बलात्कारींना दोषी ठरवले जाते. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने गेल्या बुधवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात बलात्कारविरोधी फौजदारी कायद्यासह सुमारे तीन डझन कायदे घाईघाईने मंजूर केले आहेत. त्यामध्येच एक बलात्कारविरोधी कायदा देखील आहे. पोलंड, दक्षिण कोरिया, झेक प्रजासत्ताक आणि काही यूएस राज्यांसह देशांमधील काही लैंगिक गुन्ह्यांसाठी केमिकल कॅस्ट्रेशन करण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील कायद्यामध्ये देखील गुन्हेगाराला नपुसंक बनवण्याची तरतूद करण्यात आली होती.

हेही वाचा: चक्क ५५५ दातांचा मासा; रोज तुटतात एवढे दात...

मात्र, आता आम्ही गुन्हेगारी कायद्यामध्ये सुधारणा करत आहोत. यातील बलात्काऱ्यांना नपुसंक बनवण्याची तरतूद आम्ही काढून टाकत आहोत, असं सांगण्यात आलं आहे. इस्लामिक आयडीऑलॉजी काऊन्सिल, इस्लामिक दृष्टीकोनातून कायद्याचे विश्लेषण करणारी एक सरकारी संस्था यांनी केमिकलच्या मदतीने बलात्काऱ्याला नपुसंक बनवण्याची तरतूद गैर-इस्लामिक असल्याचं ठरवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

loading image
go to top