Pakistan Floods: पाकिस्तानमध्ये पावसामुळे ७२ जणांचा मृत्यू
Heavy Rain Pakistan: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ७२ लोकांचा मृत्यू झाला असून पूरस्थिती गंभीर आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अधिक पावसाचा इशारा देत नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे किमान ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही माहिती सोमवारी दिली.