पाकिस्तानमध्ये पेट्रोल २५० रुपये लीटर, अत्यावश्यक वस्तूही महाग

आगामी दिवसांत पाकिस्तानमध्ये वीजेच्या दरामध्येही वाढ होऊ शकते.
Fuel Prices Hike In Pakistan
Fuel Prices Hike In Pakistan esakal

चलन संकटाशी तोंड देणाऱ्या पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा इंधनाच्या किंमतींमध्ये (Fuel Prices) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाकिस्तानी अर्थमंत्रालयाद्वारा जारी एका सूचनेनुसार, सरकारने पेट्रोलवर १० रुपये प्रतिलिटर आणि हायस्पीड डिझेल (एचएसडी), राॅकेल आणि हलके डिझेल तेलावर (एलडीओ) पाच रुपये लिटर पेट्रोलियम लेव्ही लावली जाते. यामुळे इंधनाच्या किंमतींत वाढ झाली आहे. या बरोबरच पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (Pakistan Fuel Prices Hikes, Essential Items Price Go High)

Fuel Prices Hike In Pakistan
अफगाणिस्तान हादरले; भूकंपात २६ जणांचा बळी

किती झाले महाग?

पाकिस्तान (Pakistan) सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोलची किंमत १४.८५ रुपयांनी वाढून २४८.७४ रुपये प्रतिलिटर झाली आहे. हायस्पीड डिझेलच्या किंमतीत १३.२३ रुपये आणि राॅकेलच्या दरात १८.८३ रुपये प्रतिलिटरने वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये आता हायस्पीड डिझेल २७६.५४ रुपये प्रतिलिटर झाले आहे. राॅकेलचे तेल २३०.२६ रुपये प्रतिलिटराने विकत आहे.

सरकारची स्थिती घराब

पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईलने इस्लामाबादमधील एका पत्रकार परिषदेत सांगितले, की सरकार आता आणखी अधिक अनुदान सहन करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे वाढ आवश्यक आहे.

Fuel Prices Hike In Pakistan
अफगाणिस्तानातून इराण, पाकिस्तानात 10 लाखांहून अधिक नागरीक स्थलांतरीत

पॅकेजचा प्रयत्न

या वर्षी एप्रिलमध्ये सत्ता सांभाळणाऱ्या शहाबाज शरीफ सरकारच्या कार्यकाळात चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. पाकिस्तानने थांबलेल्या सहा अब्ज डाॅलरच्या बेलआऊट पॅकेज पुन्हा सुरु करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) निर्देशावर हा निर्णय घेतला आहे. आयएमएफने बेलआऊट कार्यक्रमाला पुन्हा सुरु करण्यासाठी पेट्रोलियम उत्पादनांवर लेव्ही लावण्यासारखे कडक अटी ठेवल्या होत्या. येणाऱ्या दिवसांत पाकिस्तानमध्ये वीजेच्या दरामध्येही वाढ होऊ शकते. कारण आयएमएफने वीजेच्या दरांमध्येही वाढ करण्याची अट ठेवली आहे.

Fuel Prices Hike In Pakistan
अमेरिका, ब्रिटनला महागाई दराचे चटके

अत्यावश्यक वस्तुंही महाग

पाकिस्तानमध्ये वारंवार अत्यावश्यक वस्तू महाग होत चालल्या आहेत. गेल्या महिन्यात पाकिस्तानचे अर्थमंत्र्यांनी दावा केला, की ते किंमती स्थिर ठेवण्यास प्रयत्न करेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी महागाईचा ठपका माजी पंतप्रधान इम्रान खानवर ठेवला होता. ते म्हणाले होते, की देशाला कंगाल होण्यापासून वाचवण्यासाठी अत्यावश्यक वस्तुंच्या किंमतींमध्ये वाढ करावी लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com