पाकिस्तान : गृहमंत्र्यांच्या अडचणी वाढल्या, ड्रग्ज प्रकरणी तुरुंगात जाणार?

या प्रकरणी सनाउल्लाह यांना पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत
pakistan
pakistangoogle
Summary

या प्रकरणी सनाउल्लाह यांना पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत

लाहोरमध्ये अमली पदार्थ नियंत्रण विशेष न्यायालयाने पाकिस्तानचे नेते राणा सनाउल्लाह यांना समन्स बजावले आहे. ड्रग्ज प्रकरणी त्यांच्यावर २५ जून रोजी आरोप निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे गृहमंत्री सनाउल्लाह (Rana Sanaullah) हे ड्रग्ज प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे.

कोणत्याही देशातील पतंप्रधान यांच्यानंतर गृहमंत्रिपद महत्वाचं मानलं जातं. दरम्यान, या प्रकरणी सनाउल्लाह यांना पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर त्यांच्यावरील आरोप निश्चित झाले तर शाहबाज शरीफ सरकारला फटका बसणार असल्याची शक्यता आहे.

pakistan
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अन् राहुल गांधींना ED चा समन्स

जुलै 2019 मध्ये इम्रान खान सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी दलाने राणा सनाउल्लाह यांच्या अटक केली होती. त्यावेळी त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता त्यांना 15 किलो हेरॉईन सापडल्याचा दावा करण्यात आला होता. न्यायालयाने मंगळवारी जारी केलेल्या समन्सनुसार सनाउल्लाह यांच्यावर पुढील सुनावणीच्या तारखेला आरोप निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे त्यांना या सुनवणीला हजर रहावं लागणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्लाह आणि पंजाबचे मुख्यमंत्री हमजा शाहबाज यांनी शांततापूर्ण आंदोलकांवर अत्याचार आणि त्यांच्या घरांवर छापे टाकल्याबद्दल त्यांना देश कधीही माफ करणार नाही, असं इमरान खान म्हणाले आहेत. या सर्वांना लवकरच अटक करून तुरुंगात पाठवले जाईल, असा पुनरुच्चार पीटीआय प्रमुख इमरान खान यांनी केला.

pakistan
HDFC, PNB चा ग्राहकांना झटका! गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये होणार वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com