'पाकिस्तानचा काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार'

pakistan imran khan minister shireen mazari proposal on kashmir
pakistan imran khan minister shireen mazari proposal on kashmir

कराचीः पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी घेतल्यानंतर काश्मीरचा वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे की, 'पाकिस्तान सरकार काश्मीरचा वाद सोडवण्यासाठी प्रस्ताव आणण्याची तयारी करत आहे. प्रस्तावाचे बहुतांश काम झाले असून, एका आठवड्यात हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर केला जाईल. परंतु, या प्रस्तावामध्ये काय आहे, हे आता सांगू शकत नाही.'

इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात भारतासोबतचे संबंध चांगले बनवायचे आहेत, असे म्हटले होते. दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या प्रश्नावरुन वाद आहेत. परंतु, दोन्ही देशांनी चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील वाद सोडवता येतील. दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी जर भारताने एक पाऊल उचललं तर पाकिस्तान दोन पावलं उचलेल, असे इम्रान खान म्हणाले होते.

दरम्यान, पुढील महिन्यात अमेरिकेमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज न्यू यॉर्क येथे जाणार आहेत. त्यावेळी पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची त्या भेट घेणार आहेत. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या भेटीबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com