पाकिस्तान : राजीनामा की आणीबाणी? इम्रान खान यांच्या भाषणाकडे नजरा

इम्रान खान यांच्या घरी आर्मी चीफ, ISI प्रमुखांची बैठक
Imran Khan
Imran Khan Team esakal

इस्लामाबाद : पाकिस्तानातील राजकीय घडामोडींनी आता आणखी वेग घेतला आहे. काही वेळातच पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या देशाला संबोधित करणार आहेत. या संबोधनात ते एकतर राजीनामा देतील किंवा मग आणीबाणीची घोषणा करुन धक्का देतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बाजवा आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे महासंचालक इम्रान खान यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. (Pakistan Imran Khan will resign or declare emergency look at ahead speech)

इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चापूर्वीच इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. इम्रान खान यांचा सहकारी पक्ष MQM नं कॅबिनेटमधून राजीनामा देत विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. माध्यमांशी बोलताना पाकिस्तानचे गृहमंत्री रशीद शेख यांनी बुधवारी म्हटलं होतं की, इम्रान खान आज देशाला संबोधित करतील. तर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी इम्रान खान राजीनामा देणार नाहीत असं म्हटलं होतं. तसेच ते शेवटच्या बॉलपर्यंत लढतील असंही म्हटलं होतं.

दरम्यान, पाकिस्तानातील विरोधी पक्ष पाकिस्तान पिपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी आरोप केला की, २०१८च्या निवडणुकीच्या नावाखाली झालेल्या निवडी हा संपूर्ण पाकिस्तानविरोधातील कारस्थान आहे. पीपीपी आणि एमक्यूएमच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इम्रान खान यांना राजीनामा द्यावाच लागेल. ते यापुढे पंतप्रधान म्हणून कायम राहू शकत नाहीत. उद्या संसदेचं अधिवेशन असून उद्याच हा प्रश्न मार्गी लावावा लागेल, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. पतंप्रधानांनी कसलीही जबाबदारी घेतलेली नाही. पण त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, ते यापुढं पंतप्रधान राहणार नाहीत, असंही बिलाल भुट्टो झरदारी यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com