

Iranian Rial
esakal
Iran Rial Investment Risk: पाकिस्तानमध्ये नेहमी काहीतरी भलतंच सुरु असतं. आता हे पाकिस्तानी लोक भविष्यातील नफ्याच्या आमिषाने इराणचे इराणी चलन 'रियाल' आणि तिथली जुनी नाणी मोठ्या प्रमाणावर जमा करत आहेत. विशेष म्हणजे ही कोणतीही अधिकृत बँकिंग एक्सचेंज नसून, लोक अक्षरशः रद्दी किंवा कबाडच्या भावात हे चलन खरेदी करत असल्याचे दिसून येतेय.
इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि तिथली ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळे रियाल हे जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक बनले आहे, ज्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानी नागरिक करत आहेत.