
पाकिस्तानसारख्या देशात, जिथे बहुसंख्य मुस्लिम समाज आहे, तिथे हिंदू धर्मातील पवित्र आणि लोकप्रिय कथा ‘रामायण’ रंगमंचावर सादर होणे आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचे स्वागत करणे, ही खरोखरच आश्चर्यकारक घटना आहे. कराची शहरातील ‘मौज’ थिएटर ग्रुपने हा उपक्रम राबवला. या नाटकाचे दिग्दर्शन योगेश्वर करेरा यांनी केले. त्यांनी सांगितले, “रामायण मला नेहमीच प्रेरणा देत आली आहे. ही फक्त एका धर्माची कथा नाही, तर चांगुलपणाचा विजय आणि प्रेमाची ताकत यांचे प्रतीक आहे.”