Law Enforcement : पाकिस्तानने अफगाण नागरिकांना रावळपिंडी आणि इस्लामाबाद शहरांतून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत, कारण त्यांच्या स्थानिक गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग होता. अफगाण नागरिकांच्या स्थलांतराची अंतिम मुदत ३१ मार्चला संपली होती.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या रावळपिंडी आणि इस्लामाबाद शहरांतील गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असलेल्या अफगाण नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक करून देशाबाहेर काढण्याचे आदेश कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.