Video : पंतप्रधानांचं हास्य घायाळ करणारं; महिला मंत्री पंतप्रधानांवर फिदा

वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्री जरताज गुल वजीर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हास्याचं कौतुक केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधानांचं हास्य हे घायाळ करणारं आहे. त्यांची देहबोली अतिशय सुंदर आहे, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जरताज या पंतप्रधानांचं कौतुक करत आहेत.

लाहोर : पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्री जरताज गुल वजीर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हास्याचं कौतुक केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधानांचं हास्य हे घायाळ करणारं आहे. त्यांची देहबोली अतिशय सुंदर आहे, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जरताज या पंतप्रधानांचं कौतुक करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जरताज या व्हिडिओमध्ये म्हणतात, 'इम्रान खान हे एक चमत्कारिक पुरुष आहेत. जेव्हा कधी ते कोणत्या समस्येला हातात घेतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसतं. जेव्हा ते बैठक कक्षात दाखल होतात तेव्हा माझ्या सर्व शंका उडून जातात, असेही त्यांनी म्हटले. जरताज यांनी इम्रान खान यांची केल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल केलं जात आहे.

सोशल मीडियावर जरताज यांच्यावर टीका करताना संपूर्ण जगात ही बिनकामाची महिला मंत्री असल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर बॉलिवूडमध्ये सलमान खान जसं काम करतो तसं काम करण्यासाठी तुम्ही तुमच्या पंतप्रधानांना तयार करा, असंही काहींनी म्हटले असून त्यांच्यावर सध्या खूप टीका होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Minister Zartaj Gul Wazir praises on PM Imran Khan killer smile viral on social media