चिदंबरम यांच्या अटकेवर पाकिस्तानचे खासदार म्हणाले...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

माजी मंत्री पी. चिदंबरम यांनी कलम 370 ला विरोध केला असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली.

- रहमान मलिक, खासदार, पाकिस्तान.

इस्लामाबाद : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानचे खासदार रहमान मलिक यांनी चिदंबरम यांच्या अटकेचा निषेध केला. ते म्हणाले, माजी मंत्री पी. चिदंबरम यांनी कलम 370 ला विरोध केला असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली.

पाकिस्तान पीपल्स पक्षाचे (पीपीपी) खासदार मलिक यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. यामध्ये ते म्हणाले, की चिदंबरम यांनी कलम 370 ला विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. काश्मीर प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठीच मोदी सरकारकडून अशाप्रकारे घडवून आणले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, काश्मीर मुद्द्यावरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan MP Rehman Malik Statement on Chidambaram Arrest