पाकिस्तानमध्ये विरोधी पक्ष इम्रान खान यांच्या विरोधात, २४ तासांचा अल्टिमेटम

इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा आणि कायदेमंडळ बरखास्त करावे अन्यथा...
pm imran khan
pm imran khanpm imran khan

इस्लामाबाद - पाकिस्तान पीपल्स पक्षाचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. बिलावल म्हणाले, की इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा आणि कायदेमंडळ बरखास्त करावे अन्यथा अविश्वास ठरावाच्या माध्यमातून सत्तेतून बाहेर पडण्यासाठी तयार रहावे. वृत्तानुसार, लालामुसा येथे अवामी मार्चच्या समर्थकांना संबोधित करताना पीपीपी (PPP) नेता सोमवारी म्हणाले, पाकिस्तान (Pakistan) तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारसह इम्रान खान (Imran Khan) यांना सर्व लोकशाही पद्धतीने पॅकिंगसह पाठविले जाईल. निवडून आलेले इतके घाबरतात, की त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना शिव्या द्यायला सुरु केले आहे. इम्रान खान सरकार आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) दरम्यान कथित साटेलोट्याचे वर्णन करत ते म्हणाले, की देशाने सरकारच्या आर्थिक धोरणे फेटाळले आहेत. (Pakistan Peoples Party Leader Bilawal Bhutto Give Ultimatum PM Imran Khan)

pm imran khan
बाजारात लवकरच येणार Sony ची इलेक्ट्रिक कार! ग्राहकांसाठी आणखीन एक पर्याय

पीटीआयएमएफचा (पीटीआय + आयएमएफ) विरोध करत आहे. प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, देशातील आर्थिक संकटासाठी पंतप्रधान यांना दोषी ठरवत बिलावल म्हणाले, की सर्वसामान्य माणून महागाईच्या सुनामीत बुडत आहे.

इम्रान खान सरकारने कर्जासाठी भिक मागितली

पीपीपी नेता म्हणाले, की इम्रान खान सरकारने कर्जासाठी भीक मागितली. जे पूर्वी घेतलेल्या कर्जापेक्षा तीन पट अधिक होते. लोक आता त्यांच्या चुकांचे ओझे उठवू शकत नाहीत, असे ते म्हणाले. पिंडीचे शेख राशिद अहमद म्हणाले, की इम्रान खान सरकार बरखास्त झाल्यानंतर ते घरी बसणार नाहीत. हे बरोबर आहे. कारण इम्रान खान तुरुंगाच्या आत असतील. त्यांना विदेशी निधी प्रकरणी जबाबदार ठरवले जाईल, असे सूतावाच बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी केला.

pm imran khan
'पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?', पाश्चिमात्य देशांवर इम्रान खान भडकले!

इम्रान यांच्यावरील अविश्वास ठराव टिकणार नाही

पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारच्या वतीने घोषित मदत पुरेशी नसल्याचे म्हटले आहे. ते सतत पाकिस्तानी पंतप्रधानांवर दबाव टाकत आहेत. विरोधी पक्ष इम्रान खान यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव आणून आपापल्यात असलेल्या असंतोषाला वाट करुन देत आहेत. सदरील अविश्वास ठराव बारगळेल. त्यानंतर विरोधी पक्षांना त्याचा परिणाम भोगावा लागेल, असा इम्रान खान यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com