Pakistan Government: पाकिस्तानमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला! 'पीपीपी' आणि 'पीएमएल-एन'मध्ये झाली डील

Shehbaz Sharif to be coalition candidate for PM: ८ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल लागले होते. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने तिढा कायम होता.
Shehbaz Sharif
Shehbaz Sharif

नवी दिल्ली- पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेचा तिढा आता सुटल्याची चिन्ह आहेत. ८ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल लागले होते. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने तिढा कायम होता. अखेर जवळपास १५ दिवसांच्या चर्चेनंतर पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) यांच्या युतीचे सरकार बनताना दिसत आहे. (Pakistan Peoples Party PMLN strike deal to form coalition government Shehbaz Sharif to be coalition candidate for PM)

पीपीपीचे अध्यक्ष बिलावर भुट्टो जरदारी यांनी घोषणा केलीये की, पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाज शरीफ पुन्हा एक पंतप्रधानपदी येण्यास तयार आहेत. दुसरीकडे, पीपीपीचे उपाध्यक्ष आसिफ जरदारी देशाचे राष्ट्रपती बनतील. दोन्ही पक्षांमधील दीर्घ चर्चेनंतर मंगळवारी उशीरा संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये येत्या काही दिवसात नवे सरकार पाहायला मिळू शकते.

Shehbaz Sharif
Pakistan-Iran: पाकिस्तान-इराण दोन्ही मुस्लीम देश! तरी संघर्ष का निर्माण झालाय? जाणून घ्या कारण

पीपीपी आणि पीएमएल-एनने आवश्यक ती संख्या मिळवली आहे. त्यामुळे ते आता सरकार स्थापनेच्या स्थितीत आले आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआयला समर्थन देणारे अपक्ष विजयी उमेदवार आणि सुन्नी इत्तेहाद काऊंसिल (एसआयसी) यांनी आधी बहुमत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. त्यानंतर सरकार स्थापनेचा नवा फॉर्म्युला समोर आला.

Shehbaz Sharif
पाकिस्तान-इराणमधील संघर्षाचे कारण काय?

पत्रकार परिषदेत बोलताना शहबाज शरीफ यांनी दोन्ही पक्षांचे सकारात्मक चर्चा केल्याबद्दल आभार मानले. दोन्ही पक्ष एकजुटीने सरकार स्थापन करतील असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या दिशेने पाऊलं पडली आहेत. दरम्यान, पाकिस्तानमध्ये पीएमएम-एन पक्षाला ७५ जागा मिळाल्या, तर पीपीपीला ५४ जागा मिळाल्या. मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पाकिस्तान एमक्यूएम-पी पक्षाला १७ जागा मिळाल्या आहेत. या पक्षाने पीपीपी आणि पीएमएल-एन युतीला पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com