भारत-पाकिस्तान युद्धाबाबत इम्रान खान म्हणाले...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

मुस्लिमांना दुय्यम दर्जा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हिंदूंना श्रेष्ठ समजते. त्यामुळे मुस्लिमांना काश्मीरात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.   

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानकडून युद्धाची भाषाही केली जात आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले, की आमचे लष्कर पाकव्याप्त काश्मीरात कोणतीही कारवाई केली तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, हे मी मोदींना सांगू इच्छितो. 

इम्रान खान देशाला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, आमचे लष्कर पाकव्याप्त काश्मीरात कोणती कारवाई केली तर त्याला निपटण्यासाठी सज्ज आहे, असे मी मोदींना सांगू इच्छितो. जर अण्वस्त्र संपन्न देशात युद्ध झाले तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. मी ज्यांची भेट घेतो अशांना आवर्जून सांगतो. 

तसेच ते पुढे म्हणाले, काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असताना जगातील सर्व देश मौन बाळगत आहेत. सर्व जगाला माहीत आहे, की काश्मीरात काय परिस्थिती आहे. काश्मीरात मुस्लिम नसते तर सर्व जग त्यांच्यामागे उभे राहिले असते. 

मुस्लिमांना दुय्यम दर्जा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हिंदूंना श्रेष्ठ समजते. त्यामुळे मुस्लिमांना काश्मीरात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan PM Imran Khan once again issues nuclear threat to India over Kashmir issue