esakal | अणुयुद्धाची भाषा करणाऱ्या इम्रान खान यांचे घूमजाव, आता म्हणे...
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan

दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने तणाव वाढल्यास जग संकटात पडेल. अण्वस्त्रांचा वापर आम्ही प्रथम करणार नाही, असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला. लाहोरमध्ये शीख समुदायापुढे ते बोलत होते.

अणुयुद्धाची भाषा करणाऱ्या इम्रान खान यांचे घूमजाव, आता म्हणे...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद : भारताबरोबर अणुयुद्धाची दर्पोक्ती करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता घूमजाव केले असून, आम्ही प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, असा दावा केला आहे.

दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने तणाव वाढल्यास जग संकटात पडेल. अण्वस्त्रांचा वापर आम्ही प्रथम करणार नाही, असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला. लाहोरमध्ये शीख समुदायापुढे ते बोलत होते.

जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा भारताने रद्द केल्यामुळे संतापलेले पाकिस्तानी नेते प्रक्षोभक विधाने करित आहेत. 

माले ठरावातही पाक तोंडघशी 
माले (मालदीव) : काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दक्षिण आशियातील सभापतींच्या परिषदेने संमत केलेल्या माले ठरावात एकमताने नमूद करण्यात आले आहे. या ठरावामुळे काश्‍मीर प्रश्‍नाचे राजकीय भांडवल करण्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा अपयश आले असून, तो देश तोंडघशी पडला आहे. परिषदेत काश्‍मीरचा मुद्दा उकरण्याचा प्रयत्न पाकने केला होता. पण, भारताने तो हाणून पाडला. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मुद्दा काढण्यातही पाकिस्तान अपयशी ठरला.

loading image
go to top