'तू माझ्या मुलांचा बाबा होशील का?'

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पाकिस्तानच्या अभिनेत्रीने तू माझ्या मुलांचा बाबा होशील का?, असे ट्विटरवर विचारले आहे.

इस्लामाबादः पाकिस्तानच्या अभिनेत्रीने तू माझ्या मुलांचा बाबा होशील का?, असे ट्विटरवर विचारले आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केले असून, ती चर्चेत आली आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिने न्यूझीलंडचा क्रिकेटपटून जिमी नीशम याला ट्विटरवरून प्रपोज केले आहे. प्रपोज करताना तिने म्हटले आहे की, 'तू माझ्या मुलांचा बाबा होशील का?' यावर नीशमने तिला भन्नाट पद्धतीने उत्तर देतना म्हटले आहे की, 'तू विचारलेल्या प्रश्नाच्या शेवटी इमोजीची गरज नव्हती.' सेहरचे प्रपोज अन् नीशमच्या भन्नाट उत्तराने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

नीशमच्या प्रतिक्रियेवर तिने पुन्हा ट्विट करताना म्हणाली, 'नीशमने माझ्या प्रपोझच्या ट्विटला रिप्लाय दिल्यापासून भारतात मिरच्यांचा पाऊस पडला आहे. तू तिच्यापासून दूर रहा, ती दहशतवाद्यांच्या देशातील आहे, असे सगळे त्याला सांगत आहेत, जसं काय तो माझ्याशी खरंच लग्न करायला तयार झाला आहे.' नेटिझन्सनी सेहरला ट्रोल केले असून, ती चर्चेत आली आहे.

दरम्यान, न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे न्यूझीलंडचा जिमी नीशम चर्चेत आला होता. तो सामना बरोबरीत सुटल्यानंतर निकाल इंग्लंडच्या बाजूने लागला होता. त्यामुळे नीशमने युवा खेळाडूंनी क्रीडा क्षेत्राकडे वळू नये, असे ट्विट केले होते. त्यामुळे त्याच्या ट्विटची चर्चा झाली होती. पण आता त्याला एका पाकिस्तानी अभिनेत्रीने ट्विटरवर थेट प्रपोझ केल्यामुळे तो चर्चेत आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani actress sehar shinwari propose tweet new zealand cricketer jimmy neesham