Video : काश्मीरवर बोलायला गेला अन् तोंडावर पडला...

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान विश्लेषक काश्मीर विषयावर बोलत असताना खुर्ची मोडली अन् तोंडावर पडल्याची घटना घडली.

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान विश्लेषक काश्मीर विषयावर बोलत असताना खुर्ची मोडली अन् तोंडावर पडल्याची घटना घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानमधील जीटीव्हीने काश्मीर विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी विश्लेषक मझर बरलास हे बोलत असताना त्यांची खुर्ची अचानक मोडली. यामुळे ते तोंडावर पडले. लाईव्ह कार्यक्रमादरम्यान ही घटना घडल्याने अनेकांनी पाहिले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका केली आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताला अण्वस्र हल्ल्याची धमकी दिली होती. शेख हे भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताच त्यांना वीजेचा झटका बसला होता. त्यामुळे ते क्षणभर गोंधळले होते. या घटनेचे पाकिस्तानी माध्यमांच्या कॅमेरॅत चित्रीकरण झाले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani Analyst Falls Off Chair During Live TV Debate