Video: पाकची युवती म्हणतेय; ट्रम्पच माझे बाबा...

वृत्तसंस्था
Wednesday, 9 September 2020

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे माझे बाबा आहेत, असा दावा पाकिस्तानी युवतीने केला आहे. संबंधित व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असून, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कराची (पाकिस्तान): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे माझे बाबा आहेत, असा दावा पाकिस्तानी युवतीने केला आहे. संबंधित व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असून, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: चालकाने मोटार कशी पार्क केली असेल बरं?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी युवती प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगते की, डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील असून, मला त्यांना भेटायचे आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, मी डोनाल्ड ट्रम्प यांची खरी मुलगी आहे. मी एक मुस्लिम आहे आणि ब्रिटिशांसोबत जे नागरिक येतात ते मला विचारतात की ही मुलगी येथे काय करत आहे. मला इस्लाम धर्म आवडतो. ट्रम्प नेहमी माझ्या आईला सांगायचे की, तू माझ्या मुलीची काळजी घेत नाही. जेव्हा माझे आई-वडील भांडले तेव्हा मला खूप वाईट वाटले. पण, आता मला माझ्या वडिलांना भेटायचे आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 2018 मधील असल्याचे सांगितले जाते. पण, निवडणूकांच्या काळात हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. ट्रम्प नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीत व्यस्त आहेत. नेटिझन्सनी या युवतीला ट्रोल केले आहे. ट्रम्प यांचे तीन विवाह झाले असून, पहिल्या दोन पत्नीकडून त्यांना घटस्फोट मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani girl claims president donald trump is her father video viral