‘भारताला टोमॅटोचे उत्तर पाकिस्तान अणुबॉम्बने देईल’

pakistan
pakistan

इस्लामाबाद - भारताने पाकिस्तानला चांगलेच जेरीस आणले आहे. सर्वच पातळ्यांवर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्यातच भारतीय शेतकऱ्यांनी आपला माल पाकिस्तानमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने तेथे टोमॅटोचे दर 180 ते 200 रुपये प्रती किलो झाले आहेत. त्यामुळे याचा फटका पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना बसतो आहे. यावरच ‘सीटी 42’ या वृत्तवाहिनीवर एक चर्चासत्रादरम्यान संतापलेल्या एका वरिष्ठ वार्ताहाराने भारताने टोमॅटोची आयात बंद करण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे सांगितले. मात्र भारताचा विरोध नोंदवण्याची त्याची पद्धत अगदीच विनोदी ठरली. कैसर खोखर असे नाव असणाऱ्या या पत्रकराने, ‘भारताला टोमॅटोचे उत्तर पाकिस्तान अणुबॉम्बने देईल.’ अशी धमकीही त्याने यावेळी दिली आणि नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

‘हिंदुस्तानच्या सव्वा अरब लोकसंख्येने पाकिस्तानमधील टोमॅटोवर बंदी आणून चुकीचे पाऊल उचलले आहे. त्यांना अस वाटतं आहे की पाकिस्तान टोमॅटोशिवाय जगू शकत नाही. हे टोमॅटो आम्ही राहुल आणि मोदींच्या तोंडावर मारतो. ज्याप्रकारे भारतीय आज (पाकिस्तानवर) जळत आहेत, सडत आहेत त्याचप्रकारे त्यांचे टोमॅटोही जळतील. भारतातील प्रसारमाध्यमेही पाकिस्तानवर जळतात. मी हिंदुस्तानमधील जनतेला आणि तेथील प्रसारमाध्यमांना हे सांगू इच्छितो की पाकिस्तान एक अणुशक्ती असणारा देश आहे. पाकिस्तानने आपले अणुबॉम्ब ड्रॉइंग रुम सजवण्यासाठी तयार केलेले नाहीत तर ते भारतासाठी तयार केले आहेत. अशी मुक्ताफळं या वार्ताहराने उधळली आहेत. 

पुढे बोलताना सतत कान पकडून तो ‘तौबा तौबा’ असं म्हणत भारताला धमक्या देताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आता पाकिस्तानच भारताला चोमॅटो निर्यात करेल. यासाठी पंजाब सरकारने तयारी सुरु केली असून, पाकिस्तान हा जिवंत देश असल्याचे मला भारताला सांगायचे आहे. असेही तो म्हणाला. 

भारताच्या प्रसारमाध्यमांनी,लोकांनी आम्हाला घाबरायला हवे. जेव्हा पाकिस्तानची अणु हत्यारे आणि मिसाइल्स तुम्हाला उत्तर देईल तेव्हा तुम्ही तौबा तौबा करत फिराल. हा भारतासाठी तौबा तौबा करण्याचा वेळ आहे. जिथे जिथे माझा हा आवाज जात असेल तिथे भारतीय जनतेने उठून उभे रहावे आणि पाकिस्तानचे नाव घेऊन तौबा तौबा करावे. पाकिस्तान एक शूर देश असून तो टोमॅटोशिवाय जिवंत राहू शकतो.’ असे या वार्ताहराने म्हटले आहे. 

या वार्ताहराची मुक्ताफळे ऐकून त्याच्या पाठीमागे बसलेले लोकही त्याच्यावर हसताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

सोशल मिडियावर तर याला चांगलेच ट्रोल केले आहे.. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com