पाक मॉडेलचा बनावट डॉक्टरने केला गर्भपात अन्....

वृत्तसंस्था
बुधवार, 13 मार्च 2019

पाकिस्तानी मॉडेल रुबाब शफीक ही गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे गेली होती. गर्भपात करत असताना अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

कराचीः पाकिस्तानमधील एक मॉडेल गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे गेली. मात्र, गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला. डॉक्टरने तिच्या मृतदेहाची परस्पराची विल्हेवाट लावल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी मॉडेल रुबाब शफीक ही गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे गेली होती. गर्भपात करत असताना अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या डॉक्टरने व सहाय्यकाने मॉडेलचा मृतदेह मोटारीत ठेवला अन् परस्पर विल्हेवाट लावली. रुबाब ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर शोध घेतला असता गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. शिवाय, गर्भपात करणारा डॉक्टरही बनावट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करून, अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मॉडेल रुबाब शफीक हिच्या कुटुंबियांनी बनावट गर्भपात करणारे डॉक्टर व तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani model dies after failed abortion

टॅग्स