पाकिस्तानच्या जनतेनीच मारले पाकिस्तानी पायलटला

वृत्तसंस्था
शनिवार, 2 मार्च 2019

नवी दिल्ली - काल (गुरुवारी) विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले. त्यामुळे देशात आनंदाचे वातावरण आहे.. परंतु, पाकिस्तामध्ये तिथल्या स्थानिकांनी हिंदुस्थानी पायलट समजून स्वतःच्याच सैनिकाला ठेचून मारल्याची घटना घडली आहे. शाहाजुद्दिन असे या दुर्दैवी पाकिस्तानी सैनिकाचे नाव आहे. शाहाजुद्दीन यांचे F-16 विमान नौशेरा विभागात कोसळले. त्यानंतर उपस्थित पाकिस्तानी नागरिकांनी त्याला ताब्यात घेतले आणि हिंदुस्थानी सैनिक समजून चोप दिला. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.

जेव्हा विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडले तेव्हा पाकिस्तानने दोन हिंदुस्थानी सैनिक ताब्यात असल्याचा दावा केला होता. परंतु, हिंदुस्थानने आपला एकच कमांडर बेपत्ता असल्याचे म्हटले होते. हा दुसरा कमांडर पाकिस्तानी असल्याचे नंतर लक्षात आले. 

दरम्यान, हा विंग कमांडर भारताचे असल्याचे समजून त्यांना मारहाण करण्यात आली. त्याच विंग कमांडर शाहाजुद्दिन यांचा मृत्यू झाला होता. 

शाहाजुद्दिन याचे विमान कोसळल्यानंतर तो सुखरुप पॅराशूटने पाकव्याप्त कश्मीरमधील नौशेरा भागात उतरला. तिथल्या जमावाने त्याला हिंदुस्थानी सैनिक समजून मारहाण केली. नंतर जखामी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani pilot shahjuddin killed by Pakistani people