
पाकिस्तानमधील प्रत्येक पाच पैकी चार व्यक्तींना आपला देश चुकीच्या दिशेने वाटचाल करतोय, असं वाटतंhttps://www.esakal.com/jalgaon/marathi-news-chalisgaon-death-soldier-due-snow-falling-his-body-jammu-kashmir-385949
इस्लामाबाद- पाकिस्तानमधील प्रत्येक पाच पैकी चार व्यक्तींना आपला देश चुकीच्या दिशेने वाटचाल करतोय, असं वाटतं. संशोधन कंपनी IPSOS ने आपल्या नव्या सर्वेमध्ये हा दावा केला आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या या रिपोर्टमध्ये पाकिस्तानच्या विविध भागातील १००० लोकांचा सहभाग करुन घेण्यात आला होता. १ डिसेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान हा सर्वे करण्यात आला.
पाकिस्तानमधील केवळ २१ टक्के लोकांनाच वाटतं की देश योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे. दुसरीकडे तब्बल ७९ लोकांना वाटतं की पाकिस्तान दिशा भरकटला असून यामुळे देशाचे मोठे नुकसान होणार आहे. ३६ टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे, तर १३ टक्के लोकांना वाटतं की त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. ५१ टक्के लोकांनी आपली आर्थिक स्थिती चांगली किंवा वाईट नसल्याचे सांगितले आहे.
अंगावर बर्फ पडल्याने जवानाचा मृत्यू; महिनाभरात चाळीसगाव तालुक्याने दुसरा...
विविध प्रांतामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सर्व प्रातांची स्थिती बिकट असल्याचं सांगण्यात आलं आहे. चलनवाढ देशात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आर्थिक स्थिती बिकट असणाऱ्यामागे तीन गोष्टांचा विचार करण्यात आला आहे. सिंध प्रांतातील २० टक्के लोकांनी बेरोजगारी , १७ टक्के लोकांनी कोरोना महामारी आणि १६ टक्के लोकांनी गरिबी या मुद्यांना वाईट स्थितीसाठी कारणीभूत ठरवलं आहे.
पंजाब प्रांतातील २३ टक्के लोकांनी बरोजगारी, ८ टक्के लोकांनी कोरोना महामारी आणि १४ टक्के लोकांनी गरिबी या मुद्द्यांना त्यांच्या वाईट स्थितीसाठी कारणीभूत धरले आहे. खैबर पख्तुनव्हामधील २५ टक्के लोकांनी बेरोजगारीवर खापर फोडलं आहे, तर केवळ २ टक्के लोकांनी कोरोना महामारीला कारणीभूत धरलंय. २५ टक्के लोकांना वाटतं की त्यांच्या वाईट स्थितीसाठी गरिबी कारणीभूत आहे.