esakal | पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक अब्दुल कादीर यांचं निधन
sakal

बोलून बातमी शोधा

पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक अब्दुल कादीर यांचं निधन

पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक अब्दुल कादीर यांचं निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक शास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांचं रविवारी निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानची सरकारी वृत्तवाहिनी पीटिव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. शास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांना पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय नायक म्हटलं जात होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून अब्दुल कादीर फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकीकडे पाकिस्तानमध्ये त्यांना नायक म्हटलं जात होतं. तर दुसरीकडे काही देशांनी अण्वस्त्र माहिती इतर देशांना चोरुन दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. अब्दुल कादीर खान 2004 मध्ये सेवेतून बडतर्फ होईपर्यंत पाकच्या प्रमुख वैज्ञानिक उपक्रमांत सामील होते. त्यांनी इराण, उ. कोरिया व लिबिया या राष्ट्रांना बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान व डिझाइन दिल्याचे अमेरिकेनेच उघडकीस आणले होते. अमेरिकेने दिलेल्या पुराव्याच्या आधारेच खान यांना सेवेतून बडतर्फ केले होते.

अब्दुल कादीर खान यांचा जन्म अखंड भारतातील भोपाळमध्ये झाला होता. फाळणीनंतर ते पाकिस्तानला गेले होते. कराची विद्यापीठातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. लहानसहान नोकऱ्या केल्यानंतर ते 1961 मध्ये जर्मनीत व नंतर नेदरलॅण्डला गेले होते. नेदरलॅण्डमधून त्यांनी धातुशास्त्रातील पदवी मिळवली. त्याच दरम्यान नेदरलॅण्डच्या हेनी नावाच्या मुलीबरोबर त्यांनी विवाह केला. कादीर खान यांना जर्मन, डच आणि इंग्रजी भाषा चांगल्या अवगत होत्या. तेथे तंत्रज्ञानाचे भाषांतर करण्याची नोकरी मिळाली आणि त्याचा त्यांनी पुरेपूर लाभ उठवला. केवळ काही आठवडय़ांत त्यांनी सर्व गोपनीय अणुतंत्रज्ञाची कागदपत्रे मिळवून थेट पाकिस्तान गाठले. तिथे संशोधन करत पाकिस्तानसाठी कादीर यांनी अण्वस्त्र तयार केलं.

loading image
go to top