esakal | चिनी कामगारांचे विमान रोखले
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

पॅसिफिक देशांचे राष्ट्रीय साथ प्रतिसाद नियंत्रक डेव्हिड मॅनिंग यांनी जेल्टा वोंग यांनी कोरोना चाचणीवर बंदी घातली आहे. आपले खाते या दाव्याची शहानिशा करत असल्याचे म्हटले आहे. 

चिनी कामगारांचे विमान रोखले

sakal_logo
By
पीटीआय

कॅनबेरा,(ऑस्ट्रेलिया) - दक्षिण पॅसिफिकमधील पापुआ न्यू गिनीने चीनी खाण कामगारांना घेऊन येणारे विमान आज रोखले. या कामगारांवर कोरोना लशीची चाचणी घेतल्याचा खाण कंपनीचा दावा आहे. रामू निको मॅनेजमेंट (एमसीसी)लि. या कंपनीने हा दावा केल्याचे वृत्त ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने दिले आहे. पॅसिफिक देशांचे राष्ट्रीय साथ प्रतिसाद नियंत्रक डेव्हिड मॅनिंग यांनी जेल्टा वोंग यांनी कोरोना चाचणीवर बंदी घातली आहे. आपले खाते या दाव्याची शहानिशा करत असल्याचे म्हटले आहे. 

 मॅनिंग म्हणाले, ‘‘राष्ट्रीय आरोग्य विभागाने कोणत्याही चाचण्यांना मंजुरी दिलेली नाही. या कामगारांच्या चाचण्या आणि ते पापुआ न्यू गिनीमध्ये आल्यास आमच्या नागरिकांना उद्‌भवणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी मी हे विमान रद्द केले. आमचा देश व नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेतला. याबाबत चीन सरकार सविस्तर माहिती देत नाही तोपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने चीनी नागरिकांना प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंपनीच्या लेटरहेडवर ४८ कामगारांना दहा तारखेला सार्स-कोव्ह-२ ची लस दिल्याचा उल्लेख आहे. याबाबत मॅन्निंग यांनी चीन सरकारचे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करणारे पत्र चीनी राजदूत झ्यू बिंग यांना लिहिले आहे.  ही कंपनी चीन सरकारच्या चीन मेटार्लिजक ग्रुप कार्पोरेशनची कंपनी असलेल्या मेटालर्जिकल कार्पोरेशनकडून चालवली जाते. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

चीनमध्ये तीन दिवसांपूर्वी खाण कामगारांना ही लस देण्यात आली. लशीची सविस्तर माहिती अजून उपलब्ध झाली नाही. पापुआमध्ये कोणत्याही लशीची आयात करण्यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य विभागाची मंजुरी, कठोर चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण करावीच लागते. सरकारला चाचणीचे कोणतेही निवेदन मिळाले नाही.   
- जेल्टा वोंग, आरोग्यमंत्री, पापुआ न्यू गिनी

 

ऑस्ट्रेलिया सावध
ऑस्ट्रेलिया पापुआ न्यू गिनीचा परदेशी मदतीचा सर्वांत मोठा पुरवठादार आहे. या प्रदेशात चीन सरकारी मालकीच्या कंपन्यांतील कामगारांवर कोरोना लशीची चाचणी घेऊ शकतो, ही शक्यता ऑस्ट्रेलियाने लक्षात घेतली आहे, असे वृत्त ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने दिले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने मात्र अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही. 

loading image
go to top