Kim Jong Un : "हॉलिवूडचे चित्रपट पाहाल तर..."; हुकुमशाहची अंगावर काटा आणणारी शिक्षा जाणून घ्या!

किम जोंग उन यांच्या समाजवादी आदर्शांच्या अनुषंगाने मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल पालकांना इशारा देण्यात येईल.
Kim Jong Un
Kim Jong UnSakal

पाश्चिमात्य माध्यमांचा प्रभाव कमी करण्यासाठी उत्तर कोरियाने एक भयानक प्रकार करण्याचं ठरवलं आहे. जर लहान किंवा तरुण मुलं हॉलिवूडचे चित्रपट आणि टीव्ही प्रोग्रॅम पाहताना आढळले तर त्यांच्या पालकांना कारागृहात डांबून ठेवण्याची शिक्षा मिळेल. तर मुलांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा मिळेल.

ज्यांची मुलं अशा प्रकारे हॉलिवूड किंवा दक्षिण कोरियाचे चित्रपट पाहताना आढळतील, त्यांना सहा महिने छळछावणीमध्ये डांबून ठेवण्यात येईल. तर जे मुलं असे चित्रपट पाहतील, त्यांनाही पाच वर्षांची शिक्षा मिळणार आहे. पूर्वी, 'गुन्ह्यात' दोषी आढळलेले पालक कठोर शब्दात इशारा देऊन सुटू शकत होते.

Kim Jong Un
Elon Musk : मस्कला दुसरा क्रमांक मान्यच नाही; अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा टॉपला

मिररच्या अहवालानुसार, हर्मिट किंगडममधील सूत्रांचे म्हणणे आहे की प्योंगयांगने "इनमिनबान" आणले आहे - वॉच मीटिंग ज्यामध्ये शासनाचे आदेश समुदायांपर्यंत पोहोचवले जातात. पालकांना सांगितले जाईल की राज्य यापुढे तस्करी करण्यात आलेले चित्रपट पाहणाऱ्यांना दया दाखवणार नाही, रेडिओ फ्री एशियाने अहवाल दिला आहे.

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

किम जोंग उन यांच्या समाजवादी आदर्शांच्या अनुषंगाने मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल इनमिनबॅन पालकांना इशारा देईल. उल्लेखनीय म्हणजे, केवळ चित्रपट प्रेमींनाच लक्ष्य केले जात नाही, तर किम नृत्य, बोलणे आणि गाणे यांच्याशी संबंधित कठोर उपाय जारी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com