
वैमानिकाची प्रकृती खालावली, शेवटी अनुभव नसलेल्या प्रवाशानं उतरवलं विमान
वैमानिक अचानक आजारी पडल्याने उड्डाणाचा अनुभव नसलेल्या प्रवाशाने एक लहान विमान सुरक्षितपणे खाली उतरवले. ही घटना एखाद्या चित्रपटातील आहे, असं वाटते. पण, ही घटना खरी असून फ्लोरिडामध्ये (Florida) घडली आहे.
हेही वाचा: लढाऊ विमान मिराज २००० दुर्घटनाग्रस्त; वैमानिक सुखरूप
हवाई वाहतूक नियंत्रक संभाषण प्रसारीत करणारी वेबसाईट LiveATC.net वरील ऑडिओनुसार, इथं खूप गंभीर परिस्थिती उद्भवली असून माझ्या विमानाचा वैमानिक आजारी पडला आहे. विमान कसे उडवायचे आहे याची मला कल्पना नाही, असं प्रवाशाने वाहतूक नियंत्रकाला सांगितले. त्यानंतर फोर्ट पियर्स येथील हवाई वाहतूक नियंत्रकाने विचारले, त्याला सिंगल इंजिन दिसतेय का? तेव्हा प्रवासी म्हणाला, की मला काहीही कल्पना नाही. मी फक्त माझ्यासमोर फ्लोरिडाचा किनारा पाहू शकतो. त्यानंतर नियंत्रकाने विमानाच्या पंख्यांना नियंत्रित करून किनारपट्टीचे अनुसरण करण्यास सांगितले. रॉबर्ट मॉर्गन या हवाई वाहतूक नियंत्रकाने प्रवाशाला लँडींगसाठी मदत केली. प्रवाशाने हळुहळु विमान खाली उतरवले.
विमानाचे लँडींग होताच बचाव कर्मचाऱ्यांनी आजारी पडलेल्या वैमानिकाला तत्काळ रुग्णालयात हलवले. तसेच विमानाचं सुरक्षितपणे लँडींग केल्याबद्दल सर्वांनी प्रवाशाचं कौतुक केलं.
Web Title: Passenger Who Do Not Have Experience Landing Plane When Pilot Falls Ill
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..