बाप रे! सिंगापूर ते न्यूयॉर्क तब्बल 19 तासांचा विमानप्रवास

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

जगातील सर्वांत लांब पल्याची विमानसेवा आता सिंगापूर एअरलाईन्स या कंपनीने सुरु केली आहे. ही विमानसेवा सिंगापूर ते अमेरिकेतील न्यूयॉर्क अशी असेल. एकूण 18 तास 45 मिनिटांचा प्रवास यादरम्यान असणार आहे. हा प्रवास थेट असणार आहे, या प्रवासादरम्यान कुठलाही थांबा किंवा विमान बदलण्यात येणार नाही.

सिंगापूर : जगातील सर्वांत लांब पल्याची विमानसेवा आता सिंगापूर एअरलाईन्स या कंपनीने सुरु केली आहे. ही विमानसेवा सिंगापूर ते अमेरिकेतील न्यूयॉर्क अशी असेल. एकूण 18 तास 45 मिनिटांचा प्रवास यादरम्यान असणार आहे. हा प्रवास थेट असणार आहे, या प्रवासादरम्यान कुठलाही थांबा किंवा विमान बदलण्यात येणार नाही.

ही विमानसेवा सिंगापूर ते न्यूयॉर्कदरम्यानचे एकूण 16700 किमीचे अंतर यावेळी पार करेल. विमानसेवेने कापलेले हे अंतर जगातील सर्वांत जास्त असेल. याआधी ऑकलंड ते दोहा ही विमानसेवा सर्वांत जास्त अंतर कापत असायची. यासाठी तिला 17 तास 40 मिनीटांचा कालावधी लागत असे. 

सिंगापूर एअरलाईन्सच्या या विमानाने एका वेळेस एकूण 161 प्रवाशी प्रवास करू शकणार आहेत. यामध्ये 67 प्रवाशी हे बिझनेस क्लासमधील तर 94 प्रवाशी हे इकॉनॉमी क्लासमधील असणार आहेत. प्रवाशांसाठी या एकूण जवळपास 19 तासांच्या प्रवासात प्रवाशांची कसोटी असणार आहे.  सिंगापूर एअरलाईन्सकडून 1200 तासांच्या ओडिओ-व्हिजुअल्सची सोय प्रवाशांच्या सेवेसाठी करण्यात आलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers ready for world's longest flight