
कैरो : गाझा पट्टीतील शांतता व शस्त्रसंधीसाठी इजिप्त आणि कतार या मध्यस्थ देशांनी दिलेला प्रस्ताव मान्य असल्याचे हमासने जाहीर केले आहे. मात्र, अमेरिका या तिसऱ्या मध्यस्थ देशाच्या सहकार्याने आणखी एक प्रस्ताव दिला असल्याचे इस्राईलने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणता प्रस्ताव स्वीकारायचा, यावरून शस्त्रसंधीची चर्चा अडखळली आहे.