esakal | ठराविक ब्लड ग्रुपच्या लोकांना कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका?; संशोधनातील दावा!

बोलून बातमी शोधा

corona_blood group}

ब्लड ग्रुप आणि कोरोनाच्या संसर्गामध्ये काही संबंध असू शकतो का? यावर वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनातून खळबळजनक बाब समोर आली आहे. 

ठराविक ब्लड ग्रुपच्या लोकांना कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका?; संशोधनातील दावा!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

ब्लड ग्रुप आणि कोरोनाच्या संसर्गामध्ये काही संबंध असू शकतो का? यावर वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनातून खळबळजनक बाब समोर आली आहे. मात्र, केवळ निष्कर्षांमधून हे स्पष्ट होत नाही असंही या संशोधकांनी म्हटलं आहे. जाणून घ्या या संशोधनातून नक्की काय आलं समोर. 

गेल्या काही महिन्यांपासून ब्लड ग्रुप आणि कोरोनाच्या संबंधावर अनेक संशोधनं झाली आहेत. नुकत्याच नव्या संशोधनातून काही पुरावे समोर आले आहेत. ज्याद्वारे हे संकेत मिळतात की, ठराविक ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना कोविड-१९चं संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. नवा कोरोना विषाणू (सार्स-कोव-२) विशेषतः 'ए' ब्लड ग्रुपकडे जास्त आकर्षित होतो.

कोरोनाच्या संसर्गाशी ब्लड ग्रुपचा संबंध

संशोधकांनी कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर असलेल्या एका प्रोटीनवर लक्ष्य केंद्रीय केलं. ज्याला रिसेप्टर बाईंडिंग डोमेन (आरबीडी) म्हटलं जातं. हा विषाणूचा एक भाग असतो जो पेशींनी जोडला गेलेला असतो. वैज्ञानिकांसाठी हा महत्त्वाचा संशोधनाचा मुद्दा आहे कारण, विषाणू लोकांना कसं संक्रमित करतो याबाबत जाणून घेण्यासाठी हे महत्वाचं ठरतं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आरबीडी 'ए', 'बी' आणि 'ओ' ब्लड ग्रुपमध्ये श्वसन आणि लाल रक्त पेशींमुळे एकमेकांवर परिणाम करतो. याच्या परिणामांवरुन हे स्पष्ट झालं की, हे प्रोटीन 'ए' ब्लड ग्रुपवाल्या व्यक्तीच्या श्वासातील पेशींमध्ये राहण्यास प्राधान्य देतात. मात्र, 'बी' ब्लड ग्रुपच्या लाल रक्त पेशींना किंवा अन्य ब्लड ग्रुपच्या श्वसनातील लाल पेशींना प्राधान्य देत नाही. 

संशोधकांचं म्हणणं आहे की, प्रोटीनचं 'ए' ब्लड ग्रुपच्या लोकांच्या फुफ्फुसात अँटिजेनशी जोडणं आणि ओळखण्याचं प्राधान्य हे कोरोनाच्या संसर्गाच्या संभाव्य संबंध उघड करतो. या संशोधनाचे निष्कर्ष 'ब्लड अॅडव्हान्स' नामक एका नियतकालिकेत ३ मार्च रोजी प्रकाशित करण्यात आले होते. 

कोरोना विषाणूला 'ए' ब्लड ग्रुपचे जास्त आकर्षण

संशोधनाच्या टीममधील बोस्टन येथील ब्रिघम अॅण्ड विमेन हॉस्पिटलचे डॉक्टर सीन स्टोवेल यांनी म्हटलं की, हे आश्चर्यकारक आहे की व्हायरल आरबीडी श्वासाच्या पेशींमध्ये केवळ 'ए'ब्लड ग्रुपच्या अँटिजेनला प्राधान्य देतो. त्यामुळे विषाणू कशाप्रकारे बहुतेक रुग्णांमध्ये दाखल होतो आणि त्यांना संक्रमित करतो, याचा अंदाज येतो. सीन स्टोवेल पुढे म्हणतात, "ब्लड ग्रुप हे मानवासमोर एक आव्हान आहे कारण तो अनुवंशिक असतो आणि त्याला आपण बदलू शकत नाही. मात्र, जर आपण हे जाणून घेण्यात यशस्वी झालो की, विषाणू लोकांच्या ब्लड ग्रुपशी कसा जोडला जातो. तर आपल्याला नवं औषध किंवा संसर्ग रोखण्याच्या पद्धती शोधता येतील. तसेच संशोधकांनी हे देखील म्हटलं की केवळ निष्कर्षांवरुन ही भविष्यवाणी करता येणार नाही. आमचं अनुमान हे केवळ कोविड-१९च्या संक्रमणाचा ब्लड ग्रुपवर परिणाम करणाऱ्या बाबींबाबत भाष्य करतं.