esakal | 'लोकांच्या नोकऱ्या वाचतील, प्रतिस्पर्ध्यांची उत्पादने खरेदी करा', ‘बर्गर किंग’चे औदार्य
sakal

बोलून बातमी शोधा

burger king.

अवघ्या जगाला ग्रासणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाने सर्वांनाच एकत्र राहण्याची शिकवण दिली

'लोकांच्या नोकऱ्या वाचतील, प्रतिस्पर्ध्यांची उत्पादने खरेदी करा', ‘बर्गर किंग’चे औदार्य

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

लंडन- अवघ्या जगाला ग्रासणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाने सर्वांनाच एकत्र राहण्याची शिकवण दिली. अनेक महिने लांबलेले लॉकडाउन आणि इतर आव्हानांमुळे लोक एकत्र तर आलेच पण त्यांनी परस्परांना मदत देखील करायला सुरवात केली. शेवटी माणसाला आधार ही माणसेच देऊ शकतात. मग याला बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या तरी कशा काय अपवाद ठरतील. सध्या ब्रिटनमधील बर्गर किंग या कंपनीची नावीन्यपूर्ण जाहिरात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

या अमेरिकी फास्ट फूड चेनने तिच्या ट्विटर हँडलवर आपल्या ग्राहकांना मॅक्डोनाल्डज, केएफसी, पापा जॉन्स, टाको बेल्स या प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे तेथील लोकांच्या नोकऱ्या वाचतील असे कंपनीचे म्हणणे आहे. मागील सहा ते सात महिन्यांमध्ये जगभरातील फूड आणि हॉस्पिटॅलिट उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. आता या संकटातून देखील हा उद्योग हळूहळू सावरू लागला आहे.

थक्क करणारा उत्साह ! वयाच्या 67 व्या वर्षी एलएलबी फर्स्ट क्‍लास पास !!

पोस्टमध्ये नेमके काय

बर्गर किंगने प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘‘ तुम्हाला हे सांगण्याची वेळ आमच्यावर येईल, याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता पण रेस्टॉरंटमधील हजारो कर्मचाऱ्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. बर्गर किंगचे सिग्नेचर सँडवीच असणारे व्हुपर खरेदी करणे चांगलेच पण मॅक्डोनाल्डचे बिग मॅक हे हॅमबर्गर ऑर्डर करण्यात देखील काहीच वाईट नाही.’’ नेटीझन्सनी कंपनीच्या ट्विटची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.