'नोबेल'शी संबंधित व्यक्तीला बलात्कारप्रकरणी शिक्षा 

पीटीआय
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

कोपनहेगन (पीटीआय) : नोबेल पारितोषिक अकादमीशी संबंधित असलेले एका व्यक्तीला आज स्वीडनमधील न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. 

कोपनहेगन (पीटीआय) : नोबेल पारितोषिक अकादमीशी संबंधित असलेले एका व्यक्तीला आज स्वीडनमधील न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. 

मूळचा फ्रान्सचा नागरिक असलेला आणि स्वीडनच्या सांस्कृतिक वर्तुळात मोठे नाव असलेला ज्यां क्‍लाउड अर्नोल्ट याने आपल्यावर बलात्कार केल्याचे आरोप दोन महिलांनी केले होते. या पैकी एका प्रकरणात अर्नोल्ट याला न्यायालयाने आज दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तर दुसऱ्या प्रकरणात ठोस पुराव्यांच्या अभावी त्याला निर्दोष ठरविण्यात आले. स्वीडनमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी दोन ते सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. 

नोबेल पारितोषिक देणाऱ्या स्वीडिश अकादमीशी अर्नोल्ट संबंधित असून, साहित्याच्या नोबेल पुरस्कार समितीचा तो सदस्य होता. या प्रकरणामुळे अकादमीची प्रतिमा खराब झाल्याचा दावा करत या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A person related to 'Nobel' education in rape cases