esakal | कमोडमध्ये लपलेल्या सापाचा हल्ला; ६५ वर्षीय व्यक्तीला गंभीर दुखापत
sakal

बोलून बातमी शोधा

Sneak

कमोडमध्ये लपलेल्या सापाचा हल्ला; ६५ वर्षीय व्यक्तीला दुखापत

sakal_logo
By
शर्वरी जोशी

वाढत्या शहरीकरणामुळे आता जंगले नष्ट होऊ लागली आहेत. परिणामी, अनेक वन्यजीव मानवी वस्तीमध्ये येत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये प्रामुख्याने साप, अजगर वा तत्सम सरपटणाऱ्या प्राण्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अनेकदा अमूक एका व्यक्तीच्या घरात, कारमध्ये साप आढळून आल्याच्या घटना आपल्या कानावर आल्या आहेत. मात्र, ऑस्ट्रियामध्ये चक्क एका व्यक्तीच्या कमोडमध्ये साप आढळला असून या सापाने ६५ वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला दंश केला आहे. (pet-python-hidden-inside-toilet-seat-bites-man-private-part)

सध्या चर्चेत येत असलेलं प्रकरण ऑस्ट्रियामध्ये घडलं आहे. ६५ वर्षीय व्यक्ती सकाळी टॉयलेटला गेली असताना त्यांच्या कमोडमध्ये साप लपून बसला होता. मात्र, आपल्या कमोडमध्ये साप असल्याची जराही कल्पना नसल्यामुळे या व्यक्तीने कमोड वापरला. मात्र, त्याचवेळी सापाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. मात्र, वेळीच या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.

हेही वाचा: प्लस साईज स्त्रियांनी नक्की ट्राय करा 'ही' फॅशन

दरम्यान, साप विषारी नसल्यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. मात्र, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे हा साप पाळीव असून संबंधित व्यक्तीच्या शेजारी राहणाऱ्या इसमाने तो पाळला होता. परंतु, तो घरातून पळून गेलाय आणि त्याने ६५ वर्षीय व्यक्तीला दंश केलाय याची कल्पनाही सापाच्या मालकाला नव्हती. या व्यक्तीकडे या सापाव्यतिरिक्त अन्य ११ पाळीव साप आहेत.

loading image