Photo : पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गचा झालाय पुनर्जन्म? हे फोटो बघा

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

ग्रेटा पुन्हा एकदा चर्चेत आलीय ते म्हणजे एका फोटोमुळे... कोणता आहे हा फोटो?

काही दिवसांपूर्वी दमदार भाषणामुळे चर्चेत आलेली पर्यावरणावादी ग्रेटा थनबर्ग आता पुन्हा चर्चेत आली आहे. तिने हवामान बदल परिषदेत जगभरातल्या राजकारण्यांना ठणकावून प्रश्न विचारला होता. पर्यावरणाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करून तुम्ही आमचं बालपण तुम्ही उद्ध्वस्त केलंय, असा थेट आरोप तिने राजकारण्यांवर केला होता, तिच्या या भावनिक भाषणामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. ग्रेटा पुन्हा एकदा चर्चेत आलीय ते म्हणजे एका फोटोमुळे... कोणता आहे हा फोटो?

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

ग्रेटासारख्या दिसणाऱ्या एका मुलीचा 120 वर्षांपूर्वीचा फोटो सध्या व्हायरल होतोय. या मुलीचा चेहरा ग्रेटाशी हुबेहुब साधर्म्य साधणारा आहे. 1898 साली काढलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्या फोटोतील मुलगी अगदी सेम टू सेम ग्रेटासारखी दिसत आहे. त्या जुन्या फोटोत ग्रेटासारख्या दिसणाऱ्या मुलीबरोबर आणखी 2 मुले आहेत. त्या दोघींच्या इतक्या साधर्म्यामुळे ग्रेटाचा पुनर्रजन्म आहे की काय असेही म्हणले जात आहे, तर ग्रेटा टाईम ट्र्रॅव्हलर आहे असे काही जणांचे म्हणणे आहे.

Video: कुत्र्याने महामार्गावर चालवली दुचाकी...

 

वॉशिंग्टन विद्यापीठाने त्यांच्या संग्रहालयातील काही फोटो प्रकाशित केले. या फोटोंमधली ही मुलगी ग्रेटासारखी दिसत असल्याने हा फोटो व्हायरल झाला. पण ही मुलगी कोण आहे, तिचे नाव काय, ग्रेटा तिच्यासारखी कशी काय दिसते या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: photo of girls found in Washington university who is similar to Greta Thunberg