piyush goyal
sakal
बर्लिन - जर्मनीत आपल्या कर्तृत्वाने स्थान निर्माण केलेल्या भारतीय समुदायाने आता भारतातील तरुणांच्या कौशल्याला आणि क्षमतेला संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि संपर्कांचा उपयोग भारतातील तरुणांना पुढे नेण्यासाठी करा, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी येथे केले.
जर्मनीतील प्रत्येक भारतीय हा भारताचा अनौपचारिक राजदूत आहे, असे सांगत गोयल यांनी भारतीय समुदायाने दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले.