रनवेवरून विमान घसरले अन् झाले तीन तुकडे

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पाऊस आणि जोरदार वारा असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कस्तानमधील इजमीर शहरातून या विमानाने उड्डाण घेतले होते. दुर्घटनेनंतर काही जण विमानाच्या मागील बाजून खाली उड्या मारताना दिसत होते.

इस्तंबूल : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलमध्ये रनवेवर लँडींगवेळी विमान घसरल्याने झालेल्या अपघातात 52 प्रवाशी जखमी झाले असून, काही जण गंभीर आहेत. विशेष म्हणजे विमान रनवेवरून घसरल्यानंतर त्याचे तीन तुकडे झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्तंबुलमधील सबिहा गोकेन विमानतळावर पेगासस एअरलाईन्सचे विमान लँडिंग करताना हा अपघात झाला. यावेळी विमानात 177 प्रवासी होती. या अपघातात 52 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर विमानाचे तीन तुकडे झाल्यानंतर आग भडकली होती. पण, अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणली. 

पाऊस आणि जोरदार वारा असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कस्तानमधील इजमीर शहरातून या विमानाने उड्डाण घेतले होते. दुर्घटनेनंतर काही जण विमानाच्या मागील बाजून खाली उड्या मारताना दिसत होते. विमानतळ काही काळ बंद ठेवण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plane breaks into 3 pieces after it skids off runway in Turkey 52 injured