Video: विमानात ताजी हवा येण्यासाठी महिलेने उघडलं...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

विमानात बसल्यानंतर ताजी हवा येण्यासाठी महिलेने केलेले कृत्य पाहून अनेकांना हसांव की रडावं हे समजेनासे झाले आहे. महिलेने केलेल्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बीजिंग: विमानात बसल्यानंतर ताजी हवा येण्यासाठी महिलेने केलेले कृत्य पाहून अनेकांना हसांव की रडावं हे समजेनासे झाले आहे. महिलेने केलेल्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये देशातंर्गत प्रवास करण्यासाठी महिला Xiamen Airlines च्या विमानात बसली होती. परंतु, सीटवर बसल्यावर महिलेला गुदरमरल्यासारखे वाटू लागले. विमानाबाहेरील ताजी हवा घेण्यासाठी विमानाचा आपातकालीन दरवाजा उघडला. सुदैवाने विमान रन वे वरच होते. यावेळी बाजूला बसलेल्या प्रवाशांनी असे न करण्याबाबत सुचवले. पण, महिलेला ताजी हवा हवी होती. अखेर विमानातील कर्मचाऱयांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. पण, यामुळे विमान उड्डाणाला एक तास उशिर झाला.

संबंधित महिलेने आपातकालीन दरवाजा उघडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 18 मिलीयन नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला असून, प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plane passenger opens emergency exit for a breath of fresh air