esakal | 28 प्रवाशांना घेऊन जाणारे रशियाचे विमान पाण्यात कोसळले
sakal

बोलून बातमी शोधा

plane

russia plane crash : 28 लोकांना घेऊन जाणाऱ्या रशियाच्या एका विमानाचा अपघात झालाय. विमान समुद्राच्या पाण्याला धडकले असल्याचं सांगण्यात आलंय. पूर्व कामचटका भागातील ही घटना आहे.

28 प्रवाशांना घेऊन जाणारे रशियाचे विमान पाण्यात कोसळले

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मॉस्को - 28 लोकांना घेऊन जाणाऱ्या रशियाच्या एका विमानाचा अपघात झालाय. विमान समुद्राच्या पाण्याला धडकले असल्याचं सांगण्यात आलंय. पूर्व कामचटका भागातील ही घटना आहे. विमान उतरण्याची तयारी करत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याचं RIA न्यूज एजेन्सीने सांगितले. काही तासांपूर्वी विमानाशी असलेला संपर्क तुटला होता. याप्रकरणी रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने तपास सुरु केला होता. (Plane with 28 on board crashes into sea in Russia)

Antonov An-26 डबल इंजिन विमान प्रांतीय राजधानी Petropavlovsk-Kamchatsky तून कामचटकातील Palana कडे निघाले होते. यावेळी विमानाचा संपर्क तुटला. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने याची माहिती दिली होती. विमानात 22 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते. अपघातात मनुष्यहानी झालीये का? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. अधिकारी ओलगा मोखिरेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भागातील वातावरण ढगाळ होते. त्यामुळे विमानाचा संपर्क तुटला होता. TASS च्या माहितीनुसार 1982 मध्ये विमानाची बांधणी झाली आहे.

loading image