Coronavirus : इराणमधील भारतीय म्हणतात, 'आम्हाला वाचवा ओ'

वृत्तसंस्था
बुधवार, 4 मार्च 2020

अनेक विमाने रद्द

- इराणमधील खासदारांना लागण

कोलकाता : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले. आता भारतातही धुमाकूळ घातला आहे. भारतात आत्तापर्यंत 28 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर दुसरीकडे, इराणमध्ये अडकलेले 11 भारतीय नागरिक 'प्लीज, आम्हाला वाचवा', अशी हाक देत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इराणमध्ये अडकलेल्या 11 नागरिकांपैकी दोघेजण हे इंजिनिअर आहेत. ते मदतीसाठी आवाज देत आहेत. याबाबतचा त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या सयांतन बॅनर्जी यांनी सांगितले, की आम्ही इराणमध्ये राहत आहोत. कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे आम्हाला इथून बाहेर जाता येत नाही. आमची सुटका करा.

तसेच तो पुढे म्हणाला, आम्ही 22 जण या अपार्टमेंटमध्ये राहतो. आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी काम करतो. यापैकी 11 जण भारतीय आहेत. आम्ही आता भयानक अशा परिस्थितीतून जात आहोत. आम्ही बाहेर पडू शकत नाही. कोरोना व्हायरसमुळे कूम शहरातील अनेकांचा मृत्यू झाला. हे शहर आमच्या 130 किमी अंतरापर्यंत आहे.

अनेक विमाने रद्द

कोरोना व्हायरसची परिस्थिती लक्षात घेता सध्या सर्व विमानसेवा रद्द करण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांत आम्हाला काय होईल, याची आम्हाला कल्पना नाही. सरकारने यावर विचार करुन तातडीने पावले उचलावीत, असे त्याने म्हटले आहे.  

इराणमधील खासदारांना लागण

कोरोनाचा संसर्ग आतापर्यंत जवळपास ७० देशांमध्ये झाला आहे. इराणमध्ये गंभीर परिस्थिती झाली असून २३ खासदारांना संसर्ग झाला आहे. करोनाविरुद्ध इराणने आता लष्कराची मदत घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Please rescue us Indians stuck in coronavirus hit Iran