इम्रान खान यांच्याकडून पाकिस्तानच्या काळजीवाहून पंतप्रधानाची शिफारस

पाकिस्तानची संसद बरखास्त झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान यांनी मध्यावधी निवडणूक घेण्याची विनंती पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे केली होती.
Imran Khan
Imran KhanImran Khan
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानची संसद बरखास्त झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान यांनी मध्यावधी निवडणूक घेण्याची विनंती पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात वेगवान घडामोडी घडत आहेत. दरम्यान, इम्रान खान यांनी आज पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून माजी न्यायाधीश गुलझार अहमद यांच्या नावाची शिफारस केली आहे. रेडिओ पाकिस्ताननं याबाबत माहिती दिली आहे. (PM Imran Khan has proposed former CJP Justice Gulzar Ahmed as caretaker PM)

कोण आहेत गुलझार अहमद?

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्सान (पीटीआय) या पक्षाकडून गुलझार अहमद यांच्या नावाचा विचार होणं हीच मुळात आश्चर्यकारक बाब मानली जात आहे. कारण गुलझार अहमद यांनी २१ डिसेंबर २०१९ पासून १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशपद भुषवलं आहे. या काळात गुलझार यांनी पाकिस्तानच्या पीटीआय सरकारला अनेक मुद्द्यांवर फटकारलं होतं. इतकंच नव्हे एका प्रकरणात थेट तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांना समन्स देण्याचा इशाराही गुलझार अहमद यांनी दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com