PM Narendra Modi : दक्षिणी जगासाठी ‘महासागर’ धोरण; मॉरिशसमधून मोदी यांची घोषणा, विकास व सुरक्षेला प्राधान्य
Mauritius : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसमध्ये ‘महासागर’ धोरणाची घोषणा केली असून, दक्षिणी जगाच्या विकास व सुरक्षेला प्राधान्य देण्याचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यात आठ करारांवर सह्या करण्यात आल्या.
पोर्ट लुईस : हिंद-प्रशांत क्षेत्र आणि दक्षिणी जगावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिणी जगाच्या विकास आणि सुरक्षेसाठी ‘महासागर’ हे धोरण जाहीर केले.