#HowdyModi : अमेरिकन सिनेटरच्या पत्नीची मोदींनी का मागितली माफी

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

तुमचे आयुष्याचे साथीदार आज तुमच्या वाढदिवशी माझ्यासोबत असल्याने मी माफी मागतो. स्वाभाविकच आहे की त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल. तुम्हा दोघांना मी सुखी जीवनासाठी शुभेच्छा देतो. 

ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ह्यूस्टन दौऱ्यातील 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात अमेरिकन सिनेटर जॉन कॉर्निन यांच्या पत्नीची माफी मागितली. कारण, त्यांच्या पत्नीचा रविवारी वाढदिवस होता आणि ते मोदींबरोबर होते.

मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, रविवारी त्यांचा टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन शहरात हाऊडी मोदी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते. ट्रम्प असल्याने अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहातील अनेक सिनेटरही उपस्थित होते. मोदींबरोबरच्या कार्यक्रमात सिनेटर जॉन कॉर्निन सहभागी झाले होते. यावेळी मोदींना समजले की त्यांच्या पत्नीचा रविवारी वाढदिवस होता.

'हाऊडी मोदी' कार्यक्रमामुळे जॉन कार्निन आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करू शकले नाहीत. हे समजल्यानंतर मोदींनी त्यांची पत्नी सँडी हिची माफी मागितली. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. मोदी म्हणाले, की तुमचे आयुष्याचे साथीदार आज तुमच्या वाढदिवशी माझ्यासोबत असल्याने मी माफी मागतो. स्वाभाविकच आहे की त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल. तुम्हा दोघांना मी सुखी जीवनासाठी शुभेच्छा देतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi apologises to US Senator John Cornyn's wife