Israel-Hamas War : पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींशी साधला संवाद; संघर्षाबाबत व्यक्त केली चिंता

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी संपर्क साधला.
pm modi interacts with palestinian president Mahmoud Abbas concerns expressed Israel palestinian hamas conflict
pm modi interacts with palestinian president Mahmoud Abbas concerns expressed Israel palestinian hamas conflictsakal
Updated on

Israel-Hamas War : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी संपर्क साधला. गाजामधील अल-अहली दवाखान्यात झालेल्या स्फोटात नागरिकांचे बळी गेले त्यावर मोदींनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. मोदींनी या वेळी स्पष्ट केलं की पॅलेस्टाईनच्या लोकांना जी काही मानवीय मदत लागेल ती करण्यात येईल. आतंकवाद, हिंसा, बिघडलेली सुरक्षा व्यवस्था याची चिंता वाटत असल्याबाबत मोदींकडून सांगण्यात आले.

युद्धात आतापर्यंत ३७८५ लोकांचा बळी

गाझा भागातील पॅलेस्टाईनच्या मृत्यूचा आकडा ३७८५ झाला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले, इस्त्राइलने युद्धाची घोषणा केल्यापासून गाझा भागात मृत्यूची संख्या ३७८५ झाली आहे. त्यात १५२४ लहान मुले, १००० महिला आणि १२० जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. १२,४९३ नागरिक जखमी असून त्यातील ३९८३ लहान मूलं, ३३०० महिलांचा समावेश आहे.

इस्त्राइल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाला आज १२ दिवस झाले, या १२ दिवसात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एक दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्त्रायलच्या तेल अवीव येथे दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी त्यांनी इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्याहून यांची भेट घेतली होती.

ऋषी सुनक इस्त्राइलच्या दौऱ्यावर

जो बाइडेन यांच्या नंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इस्त्राइलचा दौरा केला. तेल अवीव येथे गेल्यानंतर सुनक म्हणाले या अवघड परिस्थितीत ब्रिटन इस्त्रायलच्या कायम सोबत आहे. परंतु इराण, जॉर्डन, लेबनान, सहित काही आणखी मुस्लिम देश इस्त्राइलच्या विरोधात बोलत आहेत. परंतु याचा विचार न करता इस्त्राइलकडून गाझा भागात हल्ला केला जात आहे.

हमासने कधी केला इस्त्राइलवर हल्ला ?

मीडिया रिपोर्ट नुसार इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी संघटना हमासने खूप दिवसापूर्वीच नियोजन केले होते. हमासच्या ५ विभाकडून हल्ला करण्यात आला, पहिल्यांदा मिसाईल विभागाने ७ ऑक्टोबरला सकाळी ६:३० ला ३०० रॉकेटचा मारा केला.

एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर इस्त्राइलचे नागरिक गोंधळून गेले, नंतर ऐयरबॉर्न विभागाने पॅराग्लाइडरच्या मदतीने दहशतवादी इस्त्रायलमध्ये घुसवले, नंतर कमांडो विभाग सुरक्षा रेषा ओलांडून गाझामधून इस्त्रायलमध्ये गेले. इस्त्रायलचा अंदाज आहे की जवळजवळ १००० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com