
टोकियो: जागतिक आर्थिक व्यवस्थेत स्थिरता आणण्यासाठी भारत आणि चीनने एकत्र काम करणे महत्त्वाचे आहे, हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. जपानमधील ‘द योमिउरी शिंबुन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मोदी म्हणाले की, भारत दोन्ही देशांमधील संबंध धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पुढे नेण्यास तयार आहे.