
कॅनडामधील खलिस्तानी समर्थक गटांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याच्या निर्णयाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी ‘किल मोदी’ असे नारे देत जीवे मारण्याची धमकी दिली. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 15 ते 17 जून 2025 दरम्यान अल्बर्टा येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेसाठी मोदींना निमंत्रित केले आहे. शुक्रवारी दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली, ज्याची माहिती मोदींनी X वर पोस्ट करून दिली.