Population crisis | 'तुम्ही गरोदर कधी होणार ?' सरकारचा नवविवाहीत महिलांना प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Population crisis

Population crisis : 'तुम्ही गरोदर कधी होणार ?' सरकारचा नवविवाहीत महिलांना प्रश्न

मुंबई : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश चीन सध्या आपली लोकसंख्या घटत असल्याबद्दल चिंतेत आहे. ही चिंता इतकी आहे की, नवविवाहीत महिलांना फोन करून 'तुम्ही गरोदर कधी होणार आहात' अशी थेट विचारणा केली जात आहे. एका चीनी महिलेच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ही बाब चर्चेत आली आहे.

आणखी एका चीनी महिलेने तिच्या सहकारी महिलेला आलेल्या कॉलबद्दल सांगितले आहे. या महिलेचे लग्न गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झाले होते. तेव्हापासून तिला दोन वेळा फोन आले आहेत.

नवविवाहीत असूनही अद्याप मुलाला जन्म का दिला नाही, अशी विचारणा करतानाच त्यासाठी वेळ काढण्याचा सल्ला फोनवरील अधिकारी देत आहेत.

२०१९ सालच्या आकडेवारीनुसार चीन १.४४ अब्ज लोकसंख्येसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावरील भारताची लोकसंख्या १.३९ अब्ज आहे. २०२३ पर्यंत भारत चीनला मागे टाकणार असल्याचे सांगितले जात आहे. २०५० सालापर्यंत चीनची लोकसंख्या २.२ टक्क्यांनी घटणार आहे.

लोकसंख्या घटवण्यासाठी चीनने १९७० ते १९८० च्या दशकात अनेक धोरणे राबवली. यामुळे लोकसंख्या घटू लागली; मात्र यामुळे विकासाची प्रक्रियाही मंदावली.

UN Department of Economic and Social Affairsच्या म्हणण्यानुसार १९५० नंतर जगाची लोकसंख्या मंदगतीने वाढत आहे. २०३० सालापर्यंत ही लोकसंख्या ८.५ अब्जांपर्यंत पोहोचेल. २०५० सालापर्यंत ९.७ अब्ज आणि २०८० सालापर्यंत १०.४ अब्ज इतकी लोकसंख्या असेल.