3 दिवस महिला लिफ्टमधून ओरडत होती, शेवटी मृत्यूनेच केली सुटका

महिला नऊ मजली बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये अडकल्याने मदतीसाठी ओरडत होती, पण तिचा आवाज कोणाला ऐकू न आल्याने अखेर तिचा तीन दिवसांनी दुर्दैवी मृत्यू झाला. महिलेला तीन वर्षाचा मुलगा असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
thirteen  people were stranded in a hospital elevator in Pune
thirteen people were stranded in a hospital elevator in Puneesakal

Postwoman dies after getting trapped in lift

नवी दिल्ली- तीन दिवस लिफ्टमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उझबेकिस्तानच्या ताश्कंदमधील ही घटना असून ओल्गा लिओटेव्हा ( वय 32) असं मृत महिलेचं नाव आहे. महिला पोस्टवूमन असून पत्रांची डिलव्हरी करण्यासाठी ती बिल्डिंगमध्ये गेली होती. महिला नऊ मजली बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये अडकल्याने मदतीसाठी ओरडत होती, पण तिचा आवाज कोणाला ऐकू न आल्याने अखेर तिचा तीन दिवसांनी दुर्दैवी मृत्यू झाला. महिलेला तीन वर्षाचा मुलगा असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 'द मीरर'ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

ओल्गा घरी न आल्याने तिच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये २४ जुलै रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध सुरु केला होता. २५ जुलैच्या रात्री महिलेचा मृतदेह लिफ्टमध्ये आढळून आला. पोलिसांनी बिल्डिंगमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने ओल्गाचा शोध लावला. मिळालेल्या माहितीनुसार, ओल्गाचा आवाज कोणीही ऐकलेला नाही, तसेच लिफ्टमधील अलार्म सिस्टिमही बंद होती. तीन दिवस लिफ्ट बंद होती, पण त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणालाही बोलावण्यात आलं नाही.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ओल्गा पहिल्या मजल्यावर असलेल्या लिफ्टमध्ये शिरताना पाहायला मिळत आहे. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कसून शोध सुरु केला. त्यामध्ये त्यांना ओल्गा नऊ मजली बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये आत जात असताना शेवटचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लिफ्ट चायनीज बनावटीची होती आणि कार्यरत होती. असे असले तरी लिफ्टची नोंदणी करण्यात आलेली नव्हती. स्थानिक वीज विभागाच्या प्रवक्ताने सांगितले की, त्या दिवशी वीज पुरवठा खंडीत झालेला नव्हता. त्यामुळे लिफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात अशाच प्रकारची घटना इटलीमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले होते. सिसिलिच्या पालेरोमो येथे स्थित असलेल्या एक रहिवाशी बिल्डिंगमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने महिला लिफ्टमध्ये अडकली होती. एका दिवसाने ६१ वर्षीय महिलेचा मृतदेह लिफ्टमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपातकालीन अलार्म मिळाल्यानंतर संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते, पण तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांची चौकशी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com